disease on crops in Nagpur district due to heavy rain  
नागपूर

मोठी बातमी :  नागपूर जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले; अख्खा हंगामच धोक्यात, वाचा सविस्तर

अतुल दंढारे

मेंढला (ता. नरखेड, जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या सोयाबीन पिकावर खोडकिडा, येलो मोझाईक (मुळकुंज) रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले.

शेतकरी दरवर्षी सोयाबीनच्या भरोशावर दिवाळी उत्साहाने साजरा करायचा, परंतु आता सोयाबीनवर खोडकिडा, मुळकुंज रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी हिंमत न हारता कपाशी पिकावर लक्ष्य केंद्रित केले होते. एक पीक गेले तरी कपाशीपासून यावर्षी चांगले उत्पादन घेऊ, अशी हिंमत शेतकऱ्यांना होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कपाशीचे पीकही धोक्यात आले आहे.

नरखेड तालुक्यातील महेंदी येथील शेतकरी नीलेश ढोरे यांनी यावर्षी त्याच्या तीस एकर शेतात कपाशी पिकाची लागवड केली. पीक चांगल्या स्थितीत होते. परंतु, सततच्या पावसामुळे शेतातील कपाशीवर मररोगाचा प्रादुर्भाव झाला व शेतातील संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट होत आहे. संपूर्ण शेतात पाणीच पाणी साचल्याने कपाशीची झाडे मरत आहेत. नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे. सुरुवातीला सोयाबीन पिकावर खोडकिडा गेला आणि आता कपाशी पिकावर मररोगाचा प्रादूर्भाव झाला. आता सांगा शेतकऱ्यांनी कसे जगावे, आपल्या कुटुंबीयांचा कसा सांभाळ करावा, या विचाराने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने कपाशी पिकावर आलेला मर रोगाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.

मर रोग म्हणजे काय 


शेतात जास्त प्रमाणात पाणी साचल्याने शेतातील पिकांची मुळे अति पाण्यामुळे खराब होतात. शेतात पाणी साचल्याने हा रोग वाढतो. तसेच काही जमीन जास्त पाणी साचवून ठेवू शकत नाही. त्यामुळे ती जमीन पाजरल्यासारखी होते. त्यामुळे कपाशीवर मर रोग येतो. 

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी
माझ्या शेतात यंदा तीस एकर शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड केली. पीकसुध्दा चांगल्या स्थितीत होते. परंतु दोन दिवसांच्या सततच्या पावसाने संपूर्ण कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला व कपाशी जमीनदोस्त होत आहे. तरी शासनाने कपाशी पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. 
नीलेश ढोरे 
शेतकरी नांदणी  

सततच्या पावसामुळे नुकसान
माझ्याकडे अडीच एकर शेती आहे. मी त्या संपूर्ण शेतात कपाशी पिकाची लागवड केली आहे. पहिले कपाशी पीक चांगल्या परिस्थितीमध्ये होते. परंतु दोन दिवसांच्या लगातार पावसाने संपूर्ण कपाशीवर मर रोग गेला असून संपूर्ण शेतातील कपाशी पीक नष्ट होत आहे. शासनाने लवकरात लवकर सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. 
गजानन बनकर, शेतकरी मेंढला 

शेतातून पाणी बाहेर काढा
दोन अॉगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण कपाशीच्या शेतात पाणी साचल्याने व त्या पाण्याचा निचरा होत नसल्याने कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशी पिकाच्या मुळाजवळ जास्त पाण्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीवर मर रोग आला आहे. शेतकऱ्यांनी ज्या शेतात पाणी साचलेले आहे त्या पाण्याला शेतामधून बाहेर काढावे. 
डॉ. योगीराज जुमडे, कृषी अधिकारी नरखेड

संपादित ः अतुल मांगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading: दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगला कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

Diwali Rangoli Designs: यंदा दिवाळीत अंगणात काढा 20 मिनिटांत फुलांची सुंदर रांगोळी , सर्वजण करतील कौतुक

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

Morning Breakfast: दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी घरीच बनवा चवदार स्वीट उत्तप्पा, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT